दिव्यांग कल्याण विभागात २०६३ पदे भरण्यास मान्यता; GR जाहीर….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच, या विभागात 2 हजार 63 लोकांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिले आहे.

तसेच, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले, असा टोलाही शिंदेंनी शिवसेनेला लगावला आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
