Take a fresh look at your lifestyle.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता शेतकर्‍यांना ऑनलाईन घेता येणार….

0

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता शेतकर्‍यांना ऑनलाईन घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनना वेळेवर मदत मिळणार आहे. तसेच बोगस अनुदान लाटणाऱ्यांचा पत्ता कट होणार आहे. शेतकर्‍यांना संगणकीकृत प्रणालीद्वारे पीक योजनांची त्वरीत मदत मिळवी म्हणुन महाराष्ट्र शासनाने महाआयटीद्वारे संकेतस्थळ विकसित केले आहे.

अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शेती तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला मोठे नुकसान सोसावे लागले. तसेच प्रशासकीय मिळणारी मदतही वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, त्यामुळे महात्मा जोतिबा फुले शेतकरी योजनेचा लाभ आता ऑनलाईन मिळणार आहे.

नुकसान माहिती घेण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना माहिती मिळणे कठीण असते. त्यामुळे वेळेची बचत व्हावी म्हणुन महाराष्ट्र शासनाने महाआयटीद्वारे एक संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची मदत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात मागील चार-पाच वर्षांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पावसाळा संपल्यानंतरही काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याचे उदाहरण आहेत. या प्रचंड पावसामुळे तालुका पातळीवर अनेक शेतकऱ्यांना फटका बसला होता. अशा शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी म्हणुन राज्य सरकार प्रयत्नशील आहे.