जलसंपदा विभागात लवकरच १८००+ पदांची भरती; शासन निर्णय जाहीर
जलसंपदा विभागात लवकरच १८००+ पदांची भरती राबविली जाईल असे आदेश देणार आले आहेत. त्यासंदर्भात GR प्रकाशित करण्यात आला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी. एस. (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविणेबाबत सूचना दिल्या आहेत.
तसेच सदर शासन निर्णयामधील तरतुदीनुसार संबंधित प्रशासकीय विभाग/ कार्यालयाने पदभरती करताना ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक पदभरती प्रक्रियेसाठी/ स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी कंपनीबरोबर सामंजस्य करार करणे आवश्यक आहे.