वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात ५ हजार ५६ पदांची भरती- GR जाहीर
शासनाने राज्यातील २७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार ५६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट क ड संवर्गातील मंजूर पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी ही पदे कंत्राटे पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाने जानेवारी रोजी मंजुरी दिली. त्यानुसार २७ संस्थांमधील गट क आणि ड या संवर्गातील कुशल, अकुशल, अर्धकुशल अशी ५ हजार ५६ पदे भरली जातील. २० ते ३० टक्के बचतीची अपेक्षा ही नियमित पदे भरल्यास जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या कमीत कमी २० ते ३० टक्के इतकी बचत कंत्राटी कर्मचारी भरल्यानंतर होणे अपेक्षित आहेत.
सेवापुरवठादारांशी करारनामा करताना या सूचनांचे पालन करण्याचे शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला आदेश दिले आहेत.