Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी; महाज्योती मार्फत पोलीस-सैन्यदल भरतीसाठी प्रशिक्षणासह मिळणार विद्यावेतन

0

महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस– सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.

या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अंतिम दि. 25 जानेवारी 2023 आहे. पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे.

महाज्योतीमार्फत प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे.

चार महिन्यांचे प्रशिक्षण, सहा हजार रुपये विद्यावेतनही:- प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा असून प्रशिक्षण हे अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह 6 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश व बूट देखील देण्यात येणार आहेत.

प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.

इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे. 

अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 2221041 sdswo.nagpur@gmail.com किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, नागपूर येथे संपर्क साधावा.