Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कर्मचाऱ्यांचे ‘मानधन’ दुप्पट; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे. मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्णची अट कायम राहणार आहे. २६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्यात लवकरच २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. यापाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवे मोबाइल देण्यासाठी १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.