Take a fresh look at your lifestyle.

महापालिकेची ७०६ पदांची नोकरभरती; जाणून सविस्तर माहिती

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी‎ राज्यभरामध्ये ४० हजार पदांची मेगा‎ भरती करण्याबाबत केलेली घोषणा ‎महापालिकेच्या पथ्यावर पडली असून यापूर्वी प्रक्रिया सुरू असलेल्या ७०६ ‎पदांबरोबर प्रशासकीय, लेखा व ‎लेखापरीक्षण तसेच तांत्रिक संवर्गामधील ‎जवळपास १८०० पदे असे मिळून‎ जवळपास अडीच हजार जागांच्या ‎ ‎नोकरभरतीसाठी प्रशासनाने टॉप गिअर ‎टाकला आहे.

प्रशासकीय लेखा व ‎लेखापरीक्षण तसेच तांत्रिक संवर्गामधील ‎नोकरभरतीसाठी येथे आठ दिवसांमध्ये‎ सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली‎ जाणार असून पालिकेने त्या दृष्टीने नगर ‎ विकास खात्याकडे प्रस्ताव पाठवण्याची‎ तयारी सुरू केली आहे.‎ नाशिक शहराचा झपाट्याने विकास‎ होत असून शहराची लोकसंख्या वीस‎ लाखापार झाली आहे. लोकसंख्या वाढत‎ असल्याने महापालिकेची ”ब” वर्गामध्ये‎ पदोन्नती झाली आहे.

मात्र‎ सद्यस्थितीमध्ये ”क” वर्ग‎ ‎आकृतिबंधानुसारच‎ ७०८४ पदांपैकी ४५०० अधिकारी व‎ कर्मचारी कार्यरत आहेत. वाढता‎ आस्थापना खर्च, सुधारीत आकृतिबंध‎ आणि सेवा प्रवेश नियमावलीच्या‎ अडथळ्यांमुळे रिक्त पदांची संख्या‎ २८००वर गेली आहे. त्यामुळे शहराला‎ सोयी सुविधा पुरवताना पालक संस्था‎ म्हणून महापालिकेला अडचणी येत‎ असून ही बाब लक्षात घेत मध्यंतरी नगर‎ विकास खात्याने अत्यावश्यक अशा‎ विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने‎ मंजुरी दिली.

मात्र, सेवा प्रवेश‎ नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी‎ प्रलंबित असल्याने नोकरभ रतीची‎ प्रक्रिया रखडली होती. नगरविकास‎ विभागाने अग्निशमन विभागातील ३४८‎ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय‎ विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची‎ सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्यानंतर‎ पुढील प्रक्रियेसाठी आयबीपीएस‎ संस्थांची नियुक्ती झाली.‎ बुधवारी राज्यातील प्रमुख आयुक्तांची‎ मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत प्रामुख्याने‎ नोकरभरतीच्या दृष्टिकोनातून आढावा‎ घेतला. त्यात राज्यभरात जवळपास ४०‎ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे‎ भरणे आवश्यक असल्याची बाब पुढे‎ आली.

नाशिक महापालिकेत २८०० पदे‎ रिक्त असून त्यापैकी ७०६ पदांच्या‎ भरतीसाठी मान्यता मिळाली आहे मात्र‎ उर्वरित सुमारे १८०० पदांबाबत कारवाई‎ करणे गरजेचे असल्याची बाब आयुक्त‎ डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी‎ मांडल्यानंतर नगरविकास खात्याकडे‎ पाठपुरावा करण्याबाबत सूचना देण्यात‎ आल्या.

यानुसार आता प्रशासकीय‎ लेखा व लेखापरीक्षण विभाग आणि‎ तांत्रिक संवर्गांमधील सर्व पदे भरण्यासं‎ दर्भातील सेवा प्रवेश नियमावली‎ मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. २८०० पदे भरण्याचा प्रयत्न‎ ‎१८०० पदे भरतीसाठी‎ ‎आवश्यक सेवा प्रवेश‎ ‎ नियमावली तयार‎ ‎ करून मंजुरीसाठी नगर‎ ‎ विकास कडे पुढील‎ ‎ आठवड्यामध्ये‎ ‎ पाठवली जाईल. या‎ व्यतिरिक्त, लाड पागे समिती तसेच‎ अनुकंपा तत्त्व आणि अन्य माध्यमामधून‎ पदेही भरली जातील. – डॉ. चंद्रकांत‎ पुलकुंडवार, आयुक्त‎