असंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे
छोटे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, सेल्समन, बांधकाम कामगार, किराणा, बेकरी, पानपट्टी इ दुकानदार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, न्हावी, घरगुती कामगार, भाजीविक्रेते,फळविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षाचालक, घरकाम करणारे, आशा वर्कर, दूध उत्पादक, सामान्य सेवा केंद्रचालक, स्थलांतरित कामगार, अंगणवाडी सेविका, खाजगी क्लासेस संचालक, विडी कामगार इत्यादी लाभ घेऊ शकतात.
असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडवणे यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरवले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरता केंद्र शासनाने ई- श्रम पोर्टल तयार केले आहे.
ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी www.eshram.gov.in या लिंकद्वारे ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.