पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याबाबत नवीन शासन निर्णय जारी
लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे दि.४.०८.२०२२ पासून ज्या शेतकरी, पशुपालकांकडील पशुधनाचा मृत्यू झालेला आहे, अशा शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देतांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषाप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य देण्यात यावे.

त्याचप्रमाणे अर्थसहाय्य देतांना विचारात घ्यावयाच्या मृत पशुधनाच्या संख्येवरील प्रति कुटुंब निर्बंधांचे निकष सुध्दा शिथील करून लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्या सर्व पशुधनाच्या मालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील खालील नमुद आर्थिक निकषाप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात यावे.
सदरचे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी विहित करण्यात आलेल्या दि.१६.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीत कोणताच बदल करण्यात आलेला नसून ती कार्यपध्दती तशीच लागू राहील. या अनुषंगाने आवश्यकता वाटल्यास आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी तात्काळ सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. ३३५ / का / १४३१ दि.०७.१०.२०२२ तसेच,वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४८३/२०२२ / व्यय-२ दि.११.१०.२०२२ अन्वये त्यांच्या सहमतीने निर्गमित
करण्यात येत आहे.