Take a fresh look at your lifestyle.

हार्टफुलनेस संस्था व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने निःशुल्क ध्यानोत्सव कार्यशाळेचे आयोजन

0

शारीरिक, मानसिक, भावनिक विकास व सदृढ समाज निर्मितीसाठी तसेच शांतता, बंधुता, एकता व संपूर्ण मानवतेचे कल्याणासाठी कार्य करणाऱ्या हार्टफुलनेस संस्था व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे ०३ दिवसीय निःशुल्क ध्यानोत्सव कार्यशाळेचे आयोजन करणेत आलेले आहे.

कार्यशाळेला सर्व विभागप्रमुख यांनी उपस्थित राहावे, तसेच आपले अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांना उपस्थितीचे आपले स्तरावरुन सूचित करावे. कार्यशाळा दि. १० ते १२ जानेवारी, २०२३ रोजी सायं. ०५ ते ०६ या वेळेत होईल.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सर्व संबंधितांना पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्या व्यक्तींनी कार्यशाळेचे तिन्ही सत्रांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. ध्यानोत्सव सत्रात सहभागी होण्यासाठी सोबत जोडलेल्या Google Form मध्ये सहभागी व्यक्तींची वैयक्तीक माहिती संबंधितांनी नोंदविणे आवश्यक असून सभागृहाचे आसनक्षमतेनुसार सर्वप्रथम नोंदणी केलेल्या २५० व्यक्तींनाच सत्रात सहभागी होता येईल. सत्राबाबतची अधिक माहिती सोबत जोडली आहे.

ध्यानोत्सव सत्राबाबत वेळोवेळी अधिकची माहिती Google Form मध्ये नोंदविलेल्या ई मेल ला पाठविणेत येईल. तरी मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी, उत्साह, कार्यक्षमता, निर्णयक्षमता वाढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव द्वारे आयोजित ध्यानोत्सव कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.