नवीन वर्षात शासन करणार ‘या’ पदांची मोठी भरती
येत्या नव्या वर्षात राज्यात 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थ खात्यानं शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50 टक्के पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

त्याचसोबत, महाराष्ट्रातील कोणतीही शाळा बंद करणार नसून, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचा खुलासाही दीपक केसरकर यांनी केला आहे.