पर्यटन व सांस्कृतिक विभागात भरती IBPS मार्फत होणार- GR जाहीर
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-ब (अराजपत्रित)”, “गट-क” व “गट-ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या, सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. १ व संदर्भ क्र.३ अन्वये देण्यात आलेल्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार, संदर्भ क्र.४ येथील या विभागाच्या शासन निर्णयानुसार या विभागाच्या अधिपत्याखालील (१) पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, (२) पुराभिलेख संचालनालय, (३) सांस्कृतिक कार्य संचालनालय, (४) महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी व गुजराती साहित्य अकादमी, (५) दर्शनिका विभाग, मुंबई, (६) रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई व (७) पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या सात क्षेत्रिय कार्यालयांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-ब (अराजपत्रित)”, “गट-क” व “गट-ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेसाठी टि.सी.एस.- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पदभरतीसाठी सर्व क्षेत्रिय कार्यालयांच्यावतीने संचालक मुंबई, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये यांनी आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पसनल सिलेक्शन) या कंपनीशी सामंजस्य करार करावा. सामंजस्य करारामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र.३ येथे नमूद सर्व बाबींचा समावेश करण्याची दक्षता घेण्यात यावी.
कंपनीचे दर सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयात नमूद केल्यानुसार राहतील. तसेच संदर्भ क्र. १ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात नमूद एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार सदर भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी राज्यस्तरीय समितीची राहील.
प्रशासकीय कार्यासने व क्षेत्रिय कार्यालयांची राहील. संपूर्ण भरती प्रक्रियेचे समन्वयन संचालक, पुरातत्व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांच्याकडून करण्यात येईल.
सदर ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड झालेल्या कंपनीसोबत सामजस्य करारावर व अन्य पत्रव्यवहार / मान्यता स्वाक्षरीत करण्यासाठी समितीचे अध्यक्ष तथा संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सामजंस्य करारातील अटी / शर्ती संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयाशी सुसंगत असतील यांची दक्षता घेण्यात यावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१२२११६४३५१३१२३ असा आहे.