शेळी विकास योजनेतंर्गत अहिल्या शेळी योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु
राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी
ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना सुरु करून ९०% अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटपासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ
■ उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात
तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटप करण्यात येईल.
■ एकूण रक्कम रु.६६०००/
■ लाभार्थी साठी ९० % शासन हिस्सा ( रु ५९, ४००/-)
व १० % लाभार्थी हिस्सा ( रु.६६००/-)
पात्रता
■ अनुसूचित जाती जमाती साठी दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी
■ अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक)
महिलां लाभार्थीनाच प्राधान्य.
■ लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा
जास्त नसावे.
■ पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या
योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या
व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
■ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
■ अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी / लोकप्रतिनिधी नसावा.
अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती
अर्ज सादर करण्याचा कालावधी १०/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पर्यंत. योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील
www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.