महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात १६९ कर्मचारी भरतीला मान्यता
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात १६९ कर्मचारी भरतीचा प्रश्न प्रलंबीत होता. अखेर या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून, बोर्डाच्या बैठकीत ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी दिली. नागपूर येथे वक्फ बोर्डाची बैठक पार पडली.
या बैठकीत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्यासह खासदार फौजिया खान, हसनैन शाकेर, डॉ.मुदस्सीर लांबे, मौलाना हाफिज अथर अली, समीर गुलाम नबी काजी तसेच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांची उपस्थिती होती.
वक्फ बोर्डात भरती प्रक्रिया राबविण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी मिळाली होती. यामुळे भरती प्रक्रिया राबविण्याबाबत वक्फ बोर्डाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या बैठकीत सर्व सदस्यांच्या अनुमतीने भरती प्रक्रिया राबवून लवकरात लवकर भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत प्रलंबीत मुतवल्लींचे ६५ प्रकरणेही निकाली काढण्यात आले आहे.