Take a fresh look at your lifestyle.

RRB ग्रुप डी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; असा करता येईल आपला निकाल चेक

0

रेल्वे भर्ती बोर्डाने ग्रुप डी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. RRB ग्रुप D चा निकाल 2022 शनिवार, 24 डिसेंबर 2022 पर्यंत जाहीर केला जाईल. रेल्वे भरती बोर्डाने यासंदर्भात एक नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, ग्रुप डीचा निकाल 24 डिसेंबर किंवा त्यापूर्वी कधीही जाहीर केला जाऊ शकतो. निकाल जाहीर करण्याबाबत माहिती RRB च्या अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर देण्यात आली आहे. मंडळ त्यांच्या सर्व प्रादेशिक वेबसाइटवर ग्रुप डी निकालाची लिंक सक्रिय करेल.

ही RRB परीक्षा भारतीय रेल्वेमध्ये गट D च्या एक लाखाहून अधिक पदांच्या भरतीसाठी घेण्यात आली होती. ही जागा फेब्रुवारी 2019 मध्ये आली होती. यासाठी देशभरातून एक कोटीहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, परीक्षा 17 ऑगस्ट 2022 ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत संगणक/ऑनलाइन मोड म्हणजेच CBT वर अनेक टप्प्यांत घेण्यात आली.

असा चेक करता येईल निकाल:- RRB ग्रुप D 2022 चा निकाल rrbcdg.gov.in सह रेल्वे भर्ती बोर्डाच्या इतर सर्व प्रादेशिक वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. तुम्ही ज्या प्रदेशातून परीक्षेचा फॉर्म भरला होता त्या प्रदेशाच्या वेबसाइटवर तुमचा निकाल तपासू शकता.