‘या’ विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी, पूर्णवेळ कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी…
महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर व इंडो जर्मन टूल रूम (आय जी टी आर) औरंगाबाद यांच्या द्वारे, महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास वर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ-NT) समाजाच्या नॉन क्रिमीलेयर गटातील, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीं साठी विनामूल्य, निवासी, पूर्णवेळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी किमान वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष, प्रशिक्षणाचा कालावधी बारा/सहा माहिने तसेच किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आय टी आय, अभियांत्रिकी डिप्लोमा/डिग्री आहे.
सदर प्रशिक्षणचे आयोजन इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद येथे करण्यात आलेले आहे. गरजूनीं नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहिती साठी सोबत ची जाहिरात पहा.
अर्ज भरणे सुरू आहे. नोंदणी साठी खालील रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/sy8DZHC55qQZ1vKM8
या संदर्भात अधिक माहिती साठी http/www.igtr-aur.org या वेबसाईटवर किंवा खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
प्रशिक्षण विभाग
एम एस एम ई टेक्नॉलॉजी सेंटर
इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद
पी-३१, एम आय डी सी चिकलठाणा, औरंगाबाद-431006 (म.रा.)
Website: http/www.igtr-aur.org
Mob: 9373161252, 9373161253