सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत शासन परिपत्रक जारी….
कोरोना १९ च्या पार्श्वभुमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना गट क व ड संवर्गाच्या बिंदु नामावली नोंदवही तयार करुन तातडीने आपले कार्यालयातील मागास वर्ग कक्षास सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
ही भरती प्रक्रिया आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्वाची असल्याने आपल्याकडील मागास वर्ग कक्षाचे सहकार्य आवश्यक आहे. तरी, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यालयाकडुन गट क व ड संवर्गाच्या बिंदू नामावली नोंदवह्या २ दिवसात तपासून प्रमाणित करुन देणेबाबत आपले अखत्यारीतील सहा. आयुक्त, मागास वर्ग कक्षास सुचना देण्यात याव्यात.