बार्टी तर्फे नि:शुल्क(मोफत) MPSC प्रशिक्षण (कोचिंग) साठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे. barti २८ क्वीन्स गार्डन, पुणे-४११००१. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त Website: http//:barti.maharashtra.gov.in संस्था) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा-२०२३ वा परीक्षेसाठी निःशुल्क, अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) साठी अर्ज मागविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र आयोग- राज्यसेवा परीक्षा-२०२३ निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) खालील नमूद केलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यास येणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज करावा. पात्र युवक-युवतींना https://barti.maharashtra.gov.in या वेब साईटवरून ‘Notice Board’ च्या सदराखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा-२०२३ / MPSC-२०२३ लिंकवरून अर्ज डाऊन लोड करून किंवा खालील नमुद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून नमूद केंद्राकडे दि. ०५/१२/२०२२ पर्यंत परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह सादर करावा. अ.क्र. १ महसूल विभाग औरंगाबाद प्रशिक्षण संस्थेचे नाव / पत्ता / दूरध्वनी क्रमांक संबोधी अकादमी संचलित संबोधी स्पर्धा प्रशिक्षण केंद्र, ३ रा मजला, सी बिल्डिंग, निर्माण भारती सिटी सेंटर, शासकीय ग्रंथालया समोर, निराला बाजार, औरंगाबाद, मोबाईल क्र. ७०२०९५१६५०/८३०८१६१९२९/ ७५०७७४३३२२ उपरोक्त प्रशिक्षण केंद्रामध्ये २०० अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
(सकाळच्या सत्रातील १०० विद्यार्थ्यांची एक | बॅच व दुपारच्या सत्रातील १०० विद्यार्थ्यांची दुसरी बॅच याप्रमाणे) त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी ४ टक्के जागा दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी (Person With Disability), ५% जागा अनुसूचित जाती अंतर्गत बंचित जाती मधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी ई.) विद्यार्थ्याकरिता आरक्षित असतील. एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात याव्यात.
पात्रता :- १) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा. २) अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. ३) अर्जदाराचे वय महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या अटी व शर्ती नुसार असावे. ४) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षास बसणेसाठी पात्र असावा, ५) उमेदवारांनी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला जोडावा. विद्यार्थी निवडीचे निकष:- प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने गुणवत्ता यादीतील रु. ८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश दे येईल.
प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती:- १) वर नमुद प्रशिक्षण केंद्रांकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१/१२/२०२२ २) प्रशिक्षण कालावधी १२ महिन्यांचा राहील. ३) विहीत नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रासहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा (MPSC CET 2023) वर नमुत संस्थेमार्फत दि. १५ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येईल. उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. ४) निवड झालेल्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच एकू दरमहा ८० टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्याथ्यांना दरमहा रुपये १९०००/- विद्यावेतन देण्यात येईल. 4) विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज (ऑनलाईन / ऑफलाईन) व विशेष शैक्षणिक साहित्य व पुस्तके न्यासाठी प्रशिक्षण संस्थेला ना विद्यार्थी रक्कम रु. २५०००/- देण्यात येईल. ६) प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय/निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. ७) ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी पुणे मार्फत (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व UPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यापूर्वी घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही. ८) सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही बाद अथवा धोरणात्मक प्रेम प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकतर म महासंचालक, बार्टी तसेच शासनास राहतील.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- १) उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो. २) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, उत्पनाचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र साक्षांकित प्रत ३) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेल्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती ४) शाळा सोडल्याच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत.