NDA परीक्षेसाठी ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया; १० जानेवारीपर्यंत मुदत
औरंगाबाद- एनडीए परीक्षेसाठी २१ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी इयत्ता बारावीतील विद्यार्थी अर्ज करू शकतील. त्यांना अर्ज करण्यासाठीची १० जानेवारी २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. ही परीक्षा १६ एप्रिल २०२३ रोजी होईल.
यूपीएससीची राष्ट्रीय रक्षा अकादमी (एनडीए) आणि नौसेना अकादमी (एनए) प्रवेश परीक्षा असेल. एनडीए आणि एनए परीक्षा दोन स्तरावर होईल. परीक्षा आणि त्यानंतर मुलाखती होतील. ज्यात गणित जनरल अॅबिलिटी टेस्ट असेल. लेखी परीक्षा ९००, तर मुलाखतही ९०० गुणांसाठी घेण्यात येणार आहे.