Take a fresh look at your lifestyle.

परिवहन मंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी; लगेच करा अर्ज

0

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून सोलापुरात शिकावू भरती प्रकिया सुरु झाली आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे स्वयंरोजगार प्रशिक्षण घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना या भरती प्रकिया मध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. शिकाऊ उमेदवार हा 2020, 2021, 2022 या तीन वर्षात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत परीक्षा पास झालेला असावा. यामध्ये साधारण 5 विभागात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आम्ही स्वतः जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना या संदर्भात पूर्व सूचना दिल्या आहेत. तांत्रिक दृष्ट्या हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पदांसाठी विशेष लक्ष द्यावे,असे सोलापूर विभागाचे सहाय्यक विभागीय नियंत्रक विवेक लोंढे यांनी सांगितले.

अशा असतील जागा:-
1) पदवीधर अभियांत्रिकी यासाठी 2 जागा शिल्लक आहेत. ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर इंजीनियरिंग पास असणारे तसेच ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदविकाधारक उमेदवार या पदासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

2) मोटर मेकॅनिकल वेहिकल यासाठी 23 जागा शिल्लक आहेत. त्यापैकी 1 जागा अनुसूचित जाती एक जागा अनुसूचित जमाती यासाठी राखीव आहे. या रिक्त पदासाठी एसएससी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 2 वर्षाचा मोटर मेकॅनिकल वेहिकल हा कोर्स पूर्ण होणे आवश्यक आहे.

3) मोटर वेहिकल बॉडी बिल्डर व वेल्डर या पदासाठी अनुक्रमे 7 व 1 जागा रिक्त आहेत. यामध्ये उमेदवार हा एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 1 वर्षाचा आयटीआय शीट मेटल वर्कर कोर्स पूर्ण पास असणे आवश्यक आहे.

4) पेंटर या पदासाठी एक रिक्त जागा आहे त्यामध्ये उमेदवार हा एसएससी परीक्षा पास असावा तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून एक वर्षाचा पेंटर कोर्स पास असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी अर्ज कसा करावा:-
https://www.apprenticeshipindia.gov.in/
संकेतस्थळावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत परीक्षा पास झालेला उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करिता संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, व्यवसाय/ट्रेड, उत्तीर्ण वर्ष इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग येथे आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक E 09162700889 येथे नोंद करावी.
जर उमेदवार पदवीधर असेल किंवा पदविकाधारक असेल तर https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.