Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांना दिलासा; परिचारिकांची भरती कंत्राटी नव्हे तर कायमस्वरूपी होणार….

0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय शासनाने मागे घेतला असून, शंभर टक्के पदे कायमस्वरूपी भरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने वारंवार संपाचे हत्यार उपसल्याने शासनाला नमते घ्यावे लागले आहे. संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे. जळगावच्या शासकीय महाविद्यालयात ३८१ पदे भरली जाणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाकडून एप्रिल २०२३ मध्ये भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका संवर्गासह विविध रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेऊन त्यादृष्टीने तयारीही सुरू केली होती. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांनी निषेध करून संपाचे हत्यार उपसले होते.

परिचारिकांची पदे बाह्यस्त्रोताने न भरता कायमस्वरूपी १०० टक्के पद भरती करण्यात यावी. नव्याने मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी परिचारिका संवर्गाचे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पदनिर्मिती करूनच पुढील प्रक्रया करावी, असे सांगण्यात आले आहे.