Take a fresh look at your lifestyle.

कडबा कुट्टी मशीन साठी शासन देणार 20 हजार रुपये अनुदान

0

या कडबा कुट्टी योजनेच उदिष्ट एकच की बहुतांश शेतकरी हे जनावरे पाळतात व त्यापैकी बरेच जन कोयत्याने चारा तोडून टाकतात. त्यामुळे जनवरांकडून चाऱ्याची नासाडी होते. ती नासाडी होऊ नये यासाठी ही योजना राबवली.

जनावरांना जर चारा बारीक तुकडे तुकडे करून देण्यात आला तर त्यांना पोषक आहार मिळेल व चाऱ्याची नासाडी होणार नाही. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने कडबा कुट्टी ही योजना राबवली. या योजनेचा होतकरू व गरजू शेतकऱ्यांनी नक्की लाभ घ्यावा.

योजने साठी मिळणारे अनुदान:- 1. अनुसूचित जाती व जमाती साठी 50% म्हंजे २०००० रू अनुदान मिळते
2. अल्पभूधारक शेतकरी व महिला शेतकरी यांना सुधा 50% म्हणजे २०००० रू अनुदान मिळते
3. इतर शेतकऱ्यांना 16000 रू अनुदान दिले जाते.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1.आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असावा)
2.बँक पासबुक
3.जातीचा दाखला (आवश्यक असेल तर )
4. शेतीचा 7/12 उतारा
5.शेतीचा 8 /अ उतारा

सर्व कागदपत्रे घेऊन जवळील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. व या योजनेचा लाभ घ्यावा.