Take a fresh look at your lifestyle.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2022-23 साठी अर्ज सुरु

0

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहायत बचत गटांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे
या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या
स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के शासकीय
अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची
उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल
मर्यादा 3 लाख 50 हजार इतकी असून स्वयंसहायता
बचत गटाने वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के
स्वहीस्सा भरल्यानंतर 90 टक्के म्हणजे (कमाल रुपये
3.15 लाख ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

अटी व शर्ती:-
१) योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी गटातील सर्व
सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावा.

२) बचतगट हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या
स्वयंसहायता बचत गट पुरुष किवा महिलांचा असावा.

३) स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे 80 टक्के
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.

४) गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध
घटकांतील असावा.

५) ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. ३.१५
लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.

संपर्क:- योजनेच्या अधिक माहितीसाठी व विहीत
नमुन्यातील अर्जांसाठी सहायक आयुक्त, समाज
कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा.