Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे विभागात नवीन भरतीची डेडलाईन जाहीर

0

रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे.

या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.

रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.

आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.