शेतकऱ्यांनो, प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये आर्थिक लाभ घेण्यासाठी ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज
पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. भारत सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले. PM-Kisan योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
शेतकऱ्यांना नाव नोंदणीसाठी हे 3 पर्याय
1. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
2. CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची
असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
3. शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव
नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही
करू शकतात.
अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/