Take a fresh look at your lifestyle.

आयुष्मान कार्ड असेल तर १२०० विविध आजारांवर मोफत उपचार

0

मुंबई- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता राज्यांशी विचार करून आयुष्मान कार्ड जारी केले आहेत. या कार्डसच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा तर मिळणार आहेच, शिवाय राज्य सरकारांनीही अशी योजना राबवली आहे, तर त्याच कार्डमुळे लोकांना
आरोग्याचा लाभही घेता येईल. यात जवळपास एक हजारांहून अधिक आजारांवर मोफत उपचारांची सोय आहे.

5 लाखांपर्यंत मोफत उपचार- आयुष्यमान भारत देशातील दुर्बल उत्पन्न गटातील नागरिकांना स्वस्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार आयुष्मान भारत योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत सरकार नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते. या योजनेसाठी पात्र असलेली कोणतीही व्यक्ती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकते. आयुष्मान ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे, ज्या अंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते.