Take a fresh look at your lifestyle.

PF खातेदारांसाठी व्याजाच्या पैशांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय….

0

देशातील 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ खातेदारांच्या खात्यावर अखेर व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना.. अर्थात ‘ईपीएफओ’कडून सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकार 2021- 2022 मधील व्याजाची रक्कम खात्यात जमा करीत असल्याचे समजले.

खरं तर दिवाळीआधीच ‘ईपीएफओ’ आपल्या ग्राहकांच्या खात्यावर व्याजाचे पैसे भरण्यास सुरुवात करील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अनेकाच्या खात्यावर व्याजाचे पैसे आले नव्हते. अखेर विलंबाने का होईना, ‘ईपीएफओ’कडून व्याजाचे पैसे खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाल्याने पीएफ धारकांनी आनंद व्यक्त केला आहे.

अर्थ मंत्रालयाने मार्चमध्ये पीएफवर 8.1 टक्के व्याजदर जाहीर केला होता. गेल्या चार दशकातील हा सर्वात कमी व्याजदर असल्याने पीएफ खातेदारांनी नाराजी व्यक्त केली होती. या दरानुसार व्याजाची रक्कम आता दिली जात आहे. कामगार मंत्रालय व ईपीएफओ​​कडून पीएफ खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

अशी तपासा पीएफ रक्कम:- सर्वप्रथम https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login पोर्टलवर लॉग इन करा. लाॅग इनसाठी तुमचा UAN व पासवर्ड वापरा. UAN नोंदणीकृत किंवा सक्रिय नसल्यास आधी तो सक्रिय करा. ईपीएफओ एसएमएसद्वारे नोंदणीकृत मोबाइल नंबरवर दरमहा जमा करावयाचे योगदान क्रेडिट सांगते. त्यात यूएएन क्रमांक असतो. तसेच सॅलरी स्लिपवरही हा नंबर असतो.

नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ‘EPFOHO (your) UAN’ टाइप करून 7738299899 वर टेक्स्ट मेसेज पाठवल्यास पीएफ शिल्लक समजते. मात्र, व्याज किती जमा झाले, हे कळत नाही. पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्ही 011-22901406 किंवा 9966044425 वर मिस्ड कॉल देखील देऊ शकता.