Take a fresh look at your lifestyle.

निराधार, गरजू व दुर्बल घटकांना अर्थसाहाय्य देणारी मोठी योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने
रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी
या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने
राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व
वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन
योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय
वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय
विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग
निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
या योजनेमध्ये ग्रामीण भागाकरिता ग्राम विकास विभागाने दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या सर्वेक्षणानुसार व शहरी भागासाठी नगर विकास विभागाने दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या घेतलेल्या सर्वेक्षणानुसार फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ६५ वर्ष व ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. सदर योजनेतील ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दरमहा रु.२००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता लाभार्थ्यांना दरमहा रुपये ५००/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून देण्यात येणा-या अनुक्रमे रु.
४००/- व रुपये १००/- अर्थसहाय्यात प्रत्येकी रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- ( ६५ ते ७९ वर्ष वयोगटासाठी केंद्र शासनाचे रुपये २००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/- तर ८० वर्ष व त्यावरील वयोगटाकरीता केंद्र शासनाचे रुपये ५००/- व राज्य शासनाचे रुपये ५००/- ) अशी करण्यात येत आहे.

संपर्कः- अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय /
तलाठी कार्यालय/तहसील कार्यालयात संपर्क साधावा.