Take a fresh look at your lifestyle.

या कंपन्या भरणार ६ लाख नवीन कर्मचारी; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

कोरोनामुळे मागील दोन वर्ष हे सर्वांसाठीच खूप वाईट गेले आहेत. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या व आर्थिक नुकसान हि झाले.दैनंदिन व जीवनावश्यक व्यवसाय सोडले तर बाकीच्या सर्व उद्योगधंद्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.व्यवसाय हा डिमांड सप्लाय वर चालतो. ज्या वेळेस बाजारात डिमांड असेल त्यावेळी व्यवसाय तेजीत असतो. डिमांड कमी सप्लाय जास्त असेल तर व्यवसाय तोट्यात चालतो. याच प्रकारे यावर्षी डिमांड खूप चांगली असल्या कारणाने नोकरी क्षेत्रात ४० टक्क्यांनी वाढ होऊन अपेक्षित आहे.

यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्याने सर्वजण सण आनंदाने साजरा करीत आहेत. दिवाळी देखील १ आठवड्यावर आहे. त्यामुळे यावर्षी विक्री क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.त्यामुळे यंदा याचा फायदा थेट वाहन, ईकॉमर्स, किरकोळ विक्रेत्यांना होणार आहे.

कोरोना सारख्या महामारीचे सावट दूर झाल्यामुळे आलेल्या या तेजीमुळे गतवर्षी पेक्षा असत उलाढाल होईल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.तसेच स्टपिंग कंपनीच्या अहवालानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्मचाऱ्यांची मागणी ३०-४० टक्क्यांनी अधिक राहील असे सांगितले जात आहे.त्यामुळे या सणासुदीच्या काळात ५-६ लाख हंगामी कर्मचारी यांची भरती केली जाण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रामध्ये असू शकते कर्मचाऱ्यांची मागणी:- हंगामी कर्मचाऱ्यांसाठी ईकॉमर्स, रिटेलर, दूरसंचार क्षेत्रामध्ये सर्वाधिक होण्याची शक्यता वर्तिविली जात आहे.सगळ्यात जास्त कर्मचाऱ्यांची मागणी ईकॉमर्स, लॉजिस्टिकस,पॅकेर्स, डिलिव्हरी पिकर्स,डिलिव्हरी बॉय या सारख्या क्षेत्रा मध्ये राहू शकते कारण ईकॉमर्स सणासुदीच्या काळात सर्वात जास्त डिमांड असते व यांना कर्मचाऱ्यांची गरज भासते व या काळात मोठ्या प्रमाणात भरती या क्षेत्रामध्ये निघू शकते.