तरुणांनो तयारीला लागा; महाराष्ट्र पोलीस भरतीचा नवीन शासन निर्णय(GR) प्रकाशित
राज्याच्या पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गात सुमारे 11,443 इतकी पदे भितीसाठी उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदं रिक्त झाली होती. रिक्त झालेल ही पदं 100 टक्के भरायला परवानगी मिळाली आहे. सद्यस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदं भरण्यात यावीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.