शेतकऱ्यांच्या खात्यात १७ ऑक्टोबर २०२२ रोजी PM किसान योजनेचा १२ वा हप्ता जमा होणार…
PM किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता माननीय पंतप्रधानांकडून लाभार्थ्यांशी थेट संवाद आणि १२ वा हप्ता वितरण करतील.
प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार eKYC केली आहे का? याची खात्री करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे, असे पोर्टलवर सूचित केले होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी PMKisan eKYC करणे अनिवार्य आहे, अशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जारी केली
आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची आधार
आणि बायोमेट्रिक eKYC करण्यासाठी इथे क्लिक करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेअंतर्गत दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील १२ व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार आहेत.