Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना
राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे इयत्ता १२ वी नंतर
दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच
महानगरपालिका, विभागीयस्तर, जिल्हास्तर आणि
तालुकास्तरापासुन पाच कि.मी. परिसरामध्ये स्थापित
महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (२०२२-२३) पात्र विद्यार्थ्यांकडून दि. ३१ ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करुन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन भरलेला अर्ज व अपलोड केलेले दस्ताऐवज ऑफलाईन कॉलेज मार्फत कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.

ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करण्याची मुदत:- दि. ३१
ऑक्टोंबर पर्यंत

अटी व शर्ती
१. विद्यार्थी/ विद्यार्थिनी हे अनुसूचित जमातीचे असावे.

२. जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

३. पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखाच्या
आत असणे आवश्यक.

४. विद्यार्थ्याचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे
बंधनकारक आहे व खाते आधार कार्डशी सलंग्न असावे.

५. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या
शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल अशा शहरात
विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावेत.

६. विद्यार्थी इ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा
तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ७ वर्ष या
योजनेचा लाभ घेता येईल.

७. विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे.

८. विद्यार्थ्याची संस्थेमधील/महाविद्यालयातील उपस्थिती
८० टक्के पेक्षा अधिक असणे आवश्यक.
विदयार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी/पंडीत दिनदयाळ
उपाध्याय स्वयंम योजना अर्ज ऑनलाईन http://www.rrrlf.gov.inया
संकेतस्थळावरुन सादर करावेत, विद्यार्थ्यांना पंडीत
दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना किंवा वसतीगृह
प्रवेशासाठी अर्ज करता येईल, सदर प्रवेश अभ्यासक्रम
असलेल्या कालावधीसाठी ग्राह्य असेल. सादर केलेल्या
योजनेत अर्ज मंजुर केला असता अभ्यासक्रम संपेपर्यंत
योजना बदलता येणार नाही.