Take a fresh look at your lifestyle.

नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

गेली अनेक वर्षे सरकारी गॅझेटमध्ये नाव, जन्मतारीख,
धर्म किंवा अन्य कोणताही बदल करायचा असेल तर
सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.
सरकारी कार्यालयातील फॉर्म, शुल्क भरणे आणि ही
प्रक्रिया अर्जंट व्हायला हवी असेल तर त्यासाठीचे जादा शुल्क भरणे आवश्यक होते. आता गॅझेटमधील
नावनोंदणीची सुविधा ऑनलाईन करून देण्यात आली आहे.

ही ऑनलाईन राजपत्राची पद्धती काही वर्षांपासून सुरू असली तरी अनेकांची माहितीअभावी धावपळ होते. काहीजण नावातील अथवा जन्मतारीख, धर्म बदल यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करतात. ही बाब खर्चिक असून, तिला शासकीय मान्यता नाही. महाराष्ट्र शासनाचा नाव, वय, धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा स्वतंत्र ‘भाग दोन’ विभाग असून, हा बदल अधिकृतपणे राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतो. पूर्वी नाव बदलण्याची प्रक्रिया ही किचकट होती, ऑनलाईन राजपत्रामुळे ती अतिशय सोपी व सहज झाली आहे.

राजपत्रात कोणता बदल नोंदविता येतो?:- जन्मतारीख, नाव, धर्म यातील बदल राजपत्रात अधिकृतपणे नोंदविता येतो. विवाहित व नोकरीतील महिला यांच्या नावातील बदल, नावातील काही किरकोळ चुकांची सुधारणा, अलीकडे पूर्ण नावामध्ये आईचे नाव लिहिण्याची पद्धत आली असून, काही हौसी नाव तर कुठे आडनावापुढे ‘पाटील’, नावापुढे ‘साहेब’, दत्तविधानातील नाव बदल राजपत्रात नोंदविता येतात.

राजपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे:-  आवश्यक नाव, जन्मतारीख, धर्म बदलासाठी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी आधार कार्ड/ पॅनकार्ड/ड्रायविंग लायसन्स/मतदान कार्ड/पासपोर्ट/ लाईटबील/रेशन कार्ड, एक पासपोर्ट फोटो, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, लग्नपत्रिका, दत्तकपत्र, जन्मनोंद, नावाच्या दुरुस्तीबाबत कागदपत्रे, नावातील चुकांची दुरुस्ती आदी कागदपत्रांची बदलानुसार आवश्यकता आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्यानंतर किमान 15 दिवसांच्या कालावधीत राजपत्रात बदल प्रसिद्ध करण्यात येतो.
नाव, जन्मतारीख आणि धर्मामध्ये बदल करण्यासाठी

राजपत्र नोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस:-
राजपत्र नोंदणी (Gazette) करण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
हि वेबसाईट ओपन करुन सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे.