CBSE कडून 2022-23 परीक्षांचे सॅम्पल पेपर्स जाहीर
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE ) नं चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता 10 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी सॅम्पल पेपर्स जाहीर केले आहेत. CBSE इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं आणि वेळेत होणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी CBSE ना सॅम्पल पेपर्स जारी केले आहेत. तसंच CBSE बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी मार्किंग स्कीमही जारी करण्यात आली आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वरून सॅम्पल पेपर्स तपासू आणि डाउनलोड करू शकणार आहेत.
पेपर्स डाउनलोड करण्याची पद्धत:- सीबीएससीच्या वेबसाइट www.cbse.gov.in वर जा. होमपेज वर, ‘अकॅडमिक वेबसाइट’ लिंक वर क्लिक करा. नवीन पेज उघडेल, मेन्यू मध्ये ‘Sample Question Paper’ सेक्शन वर जा. येथे ‘SQP 2022-2023’ आणि दहावी, बारावी इयत्तांची निवड करा. नव्या पेज वर, विषयवार सॅम्पल पेपर्स आणि मार्किंग स्कीम लिंक दिसेल. आपल्या विषयाच्या लिंकवर क्लिक करा, पीडीएफ उघडेल. नमुना प्रश्नपत्रिक डाऊनलोड करा आणि हार्ड कॉपी साठी प्रिंट आउट घेऊन ठेवा.