घरावर सोलर पॅनल बसवा आणि मोफत विजेचा आनंद घ्या…
केंद्र सरकारकडून सध्या अपारंपरिक ऊर्जास्रोताच्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून सोलर रूफ टॉप योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या डीलरकडून सोलर पॅनल खरेदी करून ते तुमच्या घरावर बसवा. त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा. तुम्ही जर तुमच्या घरावर तीन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला सरकार ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देते. तुम्ही जर तुमच्या घरावर दहा किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला त्यावर २० टक्के सबसीडी देण्यात येते.
सोलर पॅनलसाठी किती खर्च येतो:- जर तुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजारांच्या जवळपास खर्च येतो. मात्र त्यावर तुम्हाला चाळीस टक्क्यांपर्यंत सबसीडी मिळते. म्हणजेच तुम्हाला दोन किलो वॅटच्या सोलर सिस्टीमसाठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपयांचा खर्च येतो. एकदा तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवले तर पुढील 25 वर्ष तुमची वीजबिलापासून सुटका होऊ शकते. तसेच तुमच्या घरात चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकते.
शासनाकडून अनुदान मिळते:- भारतात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी भारत सरकारने सोलर रूफ टॉप योजना सुरू केली आहे. डिस्कॉमच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता आणि सबसिडीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये रुफटॉप सोलरची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारीही विक्रेत्याची असेल.
40 टक्क्यांपर्यंत सबसिडी:- तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सौर रुफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल. त्याच वेळी, जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंत सौर पॅनेल लावले तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळेल. स्थानिक वीज वितरण कंपनी (डिस्कॉम) ही योजना राज्यांमध्ये चालवत आहे.
Apply Here अर्ज करा:- सोलर रूफटॉप बसवण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला सोलर रूफटॉपसाठी अर्ज करावा लागेल. तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्ही राज्यानुसार लिंक निवडा. त्यानंतर फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरा. सौर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे प्रदान केलेल्या तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.