काय आहे निर्धूर चुल योजना? जाणून घ्या सविस्तर
सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो तसेच जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून न राहिल्यामुळे विहिरी आटत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येईल.

निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश:-राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप करने हा निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे. राज्यात वायू प्रदूषण कमी करने हा या योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधित राखणे हे निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे. राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हे निर्धूर चुल वाटप अभियान चे उद्दिष्ट्य आहे. राज्यात जंगलतोड थांबविने हा या योजनेचा उद्देश आहे. महिलांचे जीवनमान सुधारणे.
निर्धूर चुल वाटप अभियानाचे वैशिष्ट्य:- निर्धूर चुल वाटप योजना महाप्रीत द्वारे सूरु करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली निर्धूर चुल वाटप योजना एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. राज्यात वायुप्रदूषण थांबवण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरेल राज्यात जंगलतोडीस आळा घालण्यासाठी ही योजना महत्वाची ठरेलं. निर्धूर चुल वाटप अभियान अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. अर्जदार आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.

निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.