Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री रोजगार योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट, होतकरु युवक व युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी जाणून घेतली आहे.


“मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP योजना” ही राज्यस्तरीय योजना म्हणून तसेच कार्यक्रमा अंतर्गत (Scheme) म्हणून अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील.


मुख्यमंत्री रोजगार योजना उद्दिष्टे:- राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्ष 2019-20 साठी एकूण 10 हजार लाभार्थी घटक उदिष्ट ठेवण्यात आलेले आहे.