महत्वाचे! झेडपी, महापालिका सदस्य संख्येत मोठे बदल
महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा धडाकाच लावला आहे. तीच मालिका आजही कायम राहिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेच्या निर्णयासह महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेण्यात आले. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
राज्यातील महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मुंबई महापालिकेतील सध्याच्या 236 ऐवजी 227 सदस्य संख्या होईल. इतर महापालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या असणार आहे.
ती खालीलप्रमाणे
3 ते 6 लाख लोकसंख्या – किमान सदस्य संख्या 65, कमाल 85
6 ते 12 लाख – किमान 85, कमाल – 115
12 ते 24 लाख- किमान 115, कमाल – 151
24 ते 30 लाख – किमान 151, कमाल- 161
30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या -किमान 161, कमाल 175

झेडपी सदस्य संख्येत बदल:- जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50, तर कमाल 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या किमान 55, तर कमाल 85 सदस्य संख्या आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या घटत चालल्याने सदस्य संख्या कमी करण्यात आली आहे.