Take a fresh look at your lifestyle.

खरीप पिकांसाठी प्रधानमंञी पीक विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु

0

सन 2022-23 पासून शासनाने औरंगाबाद जिल्हयात भारतीय कृषि विमा ही कंपनी खरीप व रब्बी हंगामासाठी निश्चित केली असून सन 2022-23 पर्यंत सर्व हंगामासाठी ही कंपनी जिल्हयात कार्यरत राहणार आहे. ही कंपनी अधिसूचित क्षेञातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेञ घटकासाठी विमा संरक्षण व विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करेल.

सन 2022-23 साठी शासनाने 80:110 या बीड पॅटर्ननुसार राज्यात प्रधानमंञी पिक विमा योजना लागू असून या मध्ये जर पिकांचे नुकसान झाले नाही तर कंपनीस सेवा म्हणून एकूण विमा हप्त्याच्या 20 टक्के रक्कम देण्यात येईल व उर्वरित रक्कम कंपनी राज्यशासनाकडे परत करणार आहे. जर पिकांचे नुकसान झाले तर कंपनी जमा विमाहप्त्याच्या 110 टक्के पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम देईल व उर्वरित नुकसान भरपाई राज्यशासन देईल.

सन 2022-23 च्या खरीप हंगामात विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 ही आहे.