Take a fresh look at your lifestyle.

२०२२ पिक कर्ज मागणी अर्ज सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज

0

पिक कर्ज मागणी नोंदणी २०२२ साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक लक्षांक निश्चित करून कर्ज वाटपासाठी आता सुरवात झालेली आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पीक कर्ज – २०२२ साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर दिसत नसतील तर लवकरच तो पर्याय दिसेल किंवा सर्च टॅब मध्ये पीक कर्ज किंवा Crop Loan असे सर्च करा, पुढे तुम्हाला पीक कर्जासाठी नोंदणी लिंक मिळेल.

प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आणि तुम्हाला डॉट nic.in किंवा gov.in ची वेबसाईट ओपन करायची आहे. मी या ठिकाणी जळगांव जिल्ह्याच्या संकेतस्थळावर पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गूगल मध्ये जळगांव लिहिणार आहे. 

जळगांव जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ ओपन झाल्यावर त्यामध्ये वर सर्व प्रथम आपली मराठी भाषा निवडा. नंतर पुढे “नवीन काय” /नवीन अपडेट या नोटिफिकेशन पर्यायामध्ये “पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ” या पर्यायावर क्लिक करा किंवा सर्च टॅब मध्ये “पीक कर्ज” / Crop Loanअसे सर्च करा, पुढे तुम्हाला पीक कर्जासाठी नोंदणी लिंक मिळेल. पुढे तपशील पहा वर क्लिक करा.