Take a fresh look at your lifestyle.

महत्वाचे! शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम जूनच्या पगारात देण्याचा निर्णय

0

महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असलेल्या सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सेवानिवृत्तीधारकांसाठी आनंदाची बातमी आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या थकीत थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ही रक्कम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना रोखीने मिळेल किंवा भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा होईल.

जे कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत त्यांनादेखील ही रक्कम रोखीने अथवा रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये रोख जमा करण्यात येईल.

राज्य सरकारच्या वित्त विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा राज्यभरातील सुमारे जवळपास 16 लाख सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि जवळपास सुमारे सात लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी ही थकबाकी सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याच्या थकबाकीपोटी मिळणार आहे. प्रसारमाध्यमांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत दिलेल्या माहितीनुसार, ती पुढील प्रमाणे आहे.

गट ‘अ’ संवर्ग (अधिकारी) 30,000/- ते 40,000/-

गट ‘ब’ संवर्ग (अधिकारी) 20,000/- ते 30,000/-

गट ‘क’ संवर्ग (कर्मचारी) 10,000/- ते 15,000/-

चतुर्थ श्रेणी कर्मचारी 8,000/- ते 10,000/-