बी.एम. फाउंडेशनचे जनक दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांचा आज वाढदिवस
आज शासनाच्या महसूल विभागात सेवेत असलेले योगेश नन्नवरे यांनी सुरु केलेल्या लोकांभिमुख बी.एम.फाऊंडेशन इंडिया हे प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांच्या विचारांची मूळ प्रेरणा आहे.६० वर्षा पूर्वी (डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान यशस्वी अंमल बजावणी कामी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे मुख्य उद्देश तसेच खेड्या पाड्यातील गोरगरीब हुशार विद्यार्थी यांना शासकीय किंवा खाजगी नोकरी कामी लाभ मिळवून देणे) हा फाउंडेशन मुख्य उद्देश असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.योगेश नन्नावरे यांच्या कार्याची व्यापकता पाहून सर्वच स्तरातून कौतुक होतं असून या कार्याला पुढे नेण्यासाठी अनेक जण स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहे.
“मानवता” आणि” मुक्तिदाता भीमराव ” या दोन कविता संग्रह प्रसिद्ध करून आंबेडकरी चळवळीत साहित्याची भर घालणारे दलित मित्र पुरस्कार प्राप्त( महाराष्ट्र शासन)प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचा आज ७५ वा वाढदिवस….
आदर्श शिक्षक,साहित्यिक,कवी लेखक,पत्रकार अशा अनेक भूमिका प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांनी आपल्या खऱ्या आयुष्यात प्रभावी पणे निभावून आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली.
शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य म्हणून सेवेत असल्याने शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे… ते पिल्या नंतर मनुष्य गुर गुरल्या शिवाय राहत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य हृदयावर कोरल्या गेल्याने हजारो शोषित, पीडित, वंचित,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली. स्वतःच्या कष्टाच्या पगारातील पैसे खर्च करून अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी देखील भरली. यासोबतच युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन तसेच समजाला दिशा देणारे उल्लेखनीय कार्य मागील ६० वर्ष पासून केले आहे.
प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांनी दिलेल्या वैचारिक वारसा पुढेही असाच सुरु राहणार आहे.