Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाच्या अखत्यारितील अभ्यासक्रम प्रवेश नियमावलीत सुधारणा

0

मुंबई- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी तसेच फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारित संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.