वसतिगृहात मोफत प्रवेश; इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत मोफत शिक्षणाची संधी
कै. यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल जि. जळगाव संचलित, गुरुकुल मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह खडके बु!! ता. एरंडोल जि. जळगाव या वसतिगृहात मागासवर्गीय इ. ५वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. येथे मुलांना शिक्षणासोबतच मोफत निवासाची व्यवस्था आहे. तसेच सकाळी नाश्ता, दोन्ही वेळचे पोटभर जेवण, कपडे, बिछाना, शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. वसतिगृह प्रशासन कडून आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरातील मागासवर्गीय, गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी
प्रमोद पाटील(अधिक्षक)
मो. 8265048822, 9545583156
मधुकर कपाटे मो. 9158206955