राज्यात शासकीय डॉक्टरांची तब्बल इतक्या रिक्त जागा; जाणून घ्या कधी होणार भरती
सामान्य व गरीब रुग्णांचे आशेचे किरण असलेल्या राज्यातील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांच्या तब्बल ६० टक्के जागा रिक्त आहेत. यातही नेत्र, स्त्री रोग व शल्यचिकित्सा विभाग सोडल्यास उर्वरित १० विभागांतील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत.

प्रत्यक्ष आजारा पेक्षा देखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे वाटत आहे. महागडे खासगी रुग्णालय आणि शासकीय जीवानिशी जाण्याची भीती या रुग्णालयात नेल्यास रुग्ण कात्रीत गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. राज्यातील वैद्यकीय विभागांतर्गत महाविद्यालयांचा येणाऱ्या असता, या महाविद्यालयांवर शिक्षण वैद्यकीय विचार केला तज्ज्ञ व कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासोबत ‘टर्शरी केअर’चीही जबाबदारी आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आधीच मंजूर पदांची संख्या कमी पडत आहे. त्यात रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण पडला आहे.
सहायक प्राध्यापकांच्या ५८६ जागा रिक्त
राज्यात २२ मेडिकल कॉलेजमधील १३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापकांच्या ९४६ जागा मंजूर आहेत. यातील ३७८ जागा भरलेल्या असून, तब्बल ६० टक्के म्हणजे, ५८६ जागा रिक्त आहेत.

नेत्र शल्यचिकित्सा विभागात सर्वात कमी रिक्त जागा
नेत्र शल्यचिकित्सा विभागातील सहायक प्राध्यापकांच्या सर्वात कमी म्हणजे ४० टक्के जागा रिक्त आहेत. क्ष-किरणशास्त्र विभागात सर्वाधिक ८४ टक्के, ‘आयसीयू विभागात ८१ टक्के, त्वचा व गुप्तरोग विभागात ७५ टक्के, अस्थिव्यंगोपचार विभागात ७२ टक्के, क्षयरोग व औषध वैद्यकशास्त्र विभागात ६५ टक्के, मनोविकृतीशास्त्र विभागात ६४ टक्के, बधिरीकरणशास्त्र विभागात ६१ टक्के, कान, नाक व घसा विभागांत ५४ टक्के, बालरोग विभागात रेल ५३ टक्के, स्त्रीरोग व प्रसतिशास्त्र विभाग व शल्य चिकित्साशास्त्र विभागात प्रत्येकी ४९ टक्के जागा रिक्त आहेत.