सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारण्यात येणार, वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- वांद्रे येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते.