Take a fresh look at your lifestyle.

८वी- १०वी पास विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी! खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फेत युवकांना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार

0

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) यांचेकडून खालील दिलेले प्रशिक्षणाचे आदिवासी लाभार्थ्यां कडून योजनानिहाय अर्जमागविण्यात येत आहेत. अर्ज केवळजळगाव जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील आदिवासी युवक-युवतींकडून मागविण्यात येत आहेत. अर्ज जमा करण्याची तारीख जाहिरात देण्याच्यातारखेपासून १० दिवसात जमा करण्यात यावे.

अर्ज जमा करण्याचे ठिकाण:- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, ता. यावल, जि. जळगाव.

अर्ज जमा करण्याची वेळ:- १०ते ५ वाजेपर्यंत

प्रशिक्षणाचे नाव व शिक्षण 

आदिवासी युवक-युवतींना संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर डाटा ऑपरेटिंगचे प्रशिक्षण देणे. (१०वी पास)

अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील आदिवासी युवकांना ऑटोमोबाईलचे प्रशिक्षण देणे. (८वी पास)

अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील आदिवासी युवकांना वॉर्ड बॉयचे प्रशिक्षण देणे. (८वी पास)

वरील प्रशिक्षण हे मोफत असून, कोणत्याही प्रकारे फी घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे:- (लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा) १) जातीचा दाखला, २) आधार कार्ड, ३) मोबाइल क्रमांक, ४) रेशनकार्ड,५)मार्कशीट,६) दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र.

अर्ज (आवेदनपत्र) आदिवासी विभाग यावल मधुन घेऊन जावे.

अधिक माहितीसाठी संपर्क 

संपर्क क्रमांक- 0253-2970071

वेबसाइट- www.kvic.org.in

ईमेल- airtmkvicnsk@gmail.com