आदिवासी विकास विभाग भरती २०२६: ४४ कंत्राटी पदांसाठी अर्ज सुरू
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग भरती २०२६ ची सविस्तर माहिती
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर विविध पदे भरण्यासाठी नवीन अधिसूचना प्रसारित झाली आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून एकूण ४४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांपासून ते अभियांत्रिकी आणि क्रीडा क्षेत्रातील पदवीधारक उमेदवारांपर्यंत विविध पदांचा समावेश आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
या भरती मोहिमेत प्रामुख्याने चार प्रमुख पदांचा समावेश असून त्यांची पदानुसार विभागणी खालीलप्रमाणे आहे:
-
उपसंचालक (आरोग्य): १ जागा
-
अभियंता (संगणक/आय.टी. बी.ई.): ५ जागा
-
क्रीडा अधिकारी: ५ जागा
-
वैद्यकीय अधिकारी: ३३ जागा
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रातील विविध आदिवासी प्रकल्प कार्यालये, आश्रम शाळा आणि वसतिगृहांमध्ये सेवा बजावावी लागेल. यात प्रामुख्याने नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, यावल, राजूर, शहापूर, डहाणू, जव्हार, पेण, घोडेगाव, सोलापूर, धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमनुरी, अकोला, छत्रपती संभाजीनगर, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर, अहेरी, गडचिरोली, भामरागड आणि वर्धा या ठिकाणांचा समावेश आहे.
Important Information
-
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड ही चाचणी आणि/किंवा मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
-
संपर्क क्रमांक: भरतीसंदर्भातील कोणत्याही शंकेसाठी किंवा माहितीसाठी ९९७०६ १७११४ या संपर्कावर संपर्क साधता येईल.
-
महत्त्वाची टीप: अर्ज करताना उमेदवारांनी आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा आणि आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे व अनुभवाची कागदपत्रे पीडीएफ (PDF) स्वरूपात ई-मेलसोबत जोडणे अनिवार्य आहे.
Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process
शैक्षणिक पात्रता आणि वेतन तपशील
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | मासिक वेतन |
| उपसंचालक (आरोग्य) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS किंवा MD/DNB पदवी; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) वैध नोंदणी आवश्यक. | रु. १,००,०००/- |
| अभियंता (संगणक/आय.टी.) | मान्यताप्राप्त संस्थेची B.E. (Computer/IT) पदवी. | रु. ६०,०००/- |
| क्रीडा अधिकारी | B.P.Ed. / M.P.Ed. किंवा क्रीडा विज्ञान पदवी (Degree in Sports Science). | रु. ६०,०००/- |
| वैद्यकीय अधिकारी | MBBS किंवा BAMS पदवी; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) वैध नोंदणी आवश्यक. |
MBBS: रु. ६०,०००/- BAMS: रु. ४०,०००/- |
महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया
| तपशील | दिनांक / माहिती |
| भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख | ३० सप्टेंबर २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून लवकरात लवकर |
| अर्ज पाठवण्याचा पत्ता (E-mail) | mhtantrik@gmail.com |
| अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत वेबसाईट भेट द्या |
| महत्वाच्या लिंक्स: | |
| Notification (जाहिरात PDF) | Click Here |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | Click Here |
| Online Apply (ऑनलाईन अर्ज) | Click Here |
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत निघालेली ही ४४ कंत्राटी पदांची भरती वैद्यकीय, तांत्रिक आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कोणतीही दिरंगाई न करता वेळेत आपले अर्ज आवश्यक कागदपत्रेंसह ठरवून दिलेल्या ई-मेलवर पाठवावेत. भविष्यातील अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आमचे पोर्टल नियमित तपासात राहा.