मुंबई विद्यापीठात नवीन भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई विद्यापीठ भरती २०२६: पदाची सविस्तर माहिती
मुंबई विद्यापीठाने नुकतीच जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, विद्यापीठाच्या नाविन्यता, उष्मायन आणि संलग्नता (Innovation, Incubation and Linkages) विभागांतर्गत ‘डायनॅमिक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)’ या एकाच जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जे उमेदवार प्रशासकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी हा एक उत्तम करिअर पर्याय आहे.
वेतन आणि नोकरीचे स्वरूप
या पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला उत्तम आर्थिक मोबदला मिळणार आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार या पदासाठी दरमहा तब्बल रु. १,५०,०००/- इतके घसघशीत वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण मुंबई असून, उमेदवाराला विद्यापीठाच्या निर्धारित केलेल्या कलिना कॅम्पस येथे कार्य करावे लागेल.
Important Information
-
अर्ज शुल्क तपशील:
-
खुला प्रवर्ग (Open Category): रु. १०००/- (डिमांड ड्राफ्टद्वारे)
-
राखीव प्रवर्ग (Reserved Category): रु. ५००/- (डिमांड ड्राफ्टद्वारे)
-
-
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० ते ५५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
-
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक, नवोपक्रम, उष्मायन आणि संलग्नता (Innovation, Incubation and Linkages), मुंबई विद्यापीठ, तिसरा मजला, नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी इमारत, कलिना परिसर, विद्यानगरी, मुंबई – ४०० ०९८.
Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process
| निकष / तपशील | सविस्तर माहिती |
| शैक्षणिक पात्रता | इंजिनिअरिंग, सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा संबंधित शाखेची पदवी आणि त्यासोबत MBA / व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन किंवा टेक्नॉलॉजीमधील पोस्ट ग्रॅज्युएट पदवी. |
| आवश्यक अनुभव | नवोपक्रम (innovation), उष्मायन (incubation), IPR, उद्योजकता आणि स्टार्टअप उपक्रमांमध्ये किमान २ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. किंवा नामांकित उद्योगामध्ये २ ते ५ वर्षांचा व्यवस्थाकीय अनुभव. |
| अर्ज प्रक्रिया | उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवणे अनिवार्य आहे. |
| शेवटची तारीख | ३१ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) |
| महत्वाच्या लिंक्स: | |
| Notification (जाहिरात PDF) | Click Here |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | Click Here |
थोडक्यात सांगायचे तर, मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेत उच्च पदावर नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अनुभव आहे, त्यांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी आपला ऑफलाइन अर्ज पूर्ण माहितीसह योग्य पत्त्यावर पाठवावा. अधिकृत अधिकृत वेबसाईट वर जाऊन सविस्टर जाहिरात वाचूनच अर्ज करावा.