Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) विविध पदांवर भरती जाहीर; ताबडतोब करा अर्ज

0

महाबीज भरती २०२६: संपूर्ण माहिती

पदांचा तपशील व रिक्त जागा

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये निघालेल्या या भरतीमध्ये एकूण तीन रिक्त पदांचा समावेश आहे. यामध्ये वेगवेगळ्या तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत:

  • वरिष्ठ श्रेणी लघुलेखक (मराठी): १ जागा

  • कनिष्ठ श्रेणी लघुलेखक (इंग्रजी): १ जागा

  • एम.आय.एस. कार्यकारी (व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यकारी): १ जागा

वेतन व मानधनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाच्या स्वरूपानुसार आकर्षक मासिक मानधन दिले जाणार आहे:

  • वरिष्ठ श्रेणी लघुलेखक (मराठी): दरमहा ३२,००० रुपये

  • कनिष्ठ श्रेणी लघुलेखक (इंग्रजी): दरमहा २५,००० रुपये

  • एम.आय.एस. कार्यकारी: दरमहा ३०,००० रुपये

आवश्यक पात्रता व तपशील

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
वरिष्ठ श्रेणी लघुलेखक (मराठी) कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी लघूलेखन (१२० शब्द प्रति मिनिट) व टंकलेखन (४० शब्द प्रति मिनिट) प्रमाणपत्र अभ्यासक्रम (इंग्रजी लघूलेखन व टंकलेखन प्राधान्य) + अनुभव ३० ते ४५ वर्षे
कनिष्ठ श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) कोणत्याही शाखेची पदवी आणि इंग्रजी लघूलेखन (१२० शब्द प्रति मिनिट) व टंकलेखन (५० शब्द प्रति मिनिट) प्रमाणपत्र अभ्यासक्रम (मराठी लघूलेखन व टंकलेखन प्राधान्य) + अनुभव २५ ते ४० वर्षे
एम.आय.एस. कार्यकारी सीए इंटरमीडिएट (CA Inter) + संबंधित कामाचा अनुभव ३० ते ४५ वर्षे

अर्ज प्रक्रिया व महत्त्वाचे पत्ते

अर्ज कसा करावा?

१. उमेदवारांनी महाबीजच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना काळजीपूर्वक डाऊनलोड करावा.

२. विचारलेली सर्व माहिती अर्जात अचूकपणे भरावी.

३. आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

४. भरलेला अर्ज खालील अधिकृत पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

महाव्यवस्थापक (प्रशासन),

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड,

महाबीज भवन, कृषी नगर,

अकोला (महाराष्ट्र) – ४४४१०४

 

महत्वाच्या लिंक्स:
Notification (जाहिरात PDF)  Click Here  
Official Website(अधिकृत वेबसाईट)  Click Here

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात म्हणजेच महाबीजमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ही पदे ११ महिन्यांच्या कंत्राटी स्वरूपाची असली, तरी उमेदवारांना व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी आणि शासकीय क्षेत्रात काम करण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल. इच्छुकांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी लवकरात लवकर अर्ज करावा